अशांत सागर मनी खोलवर मुरते आहे बरेच काही
पाचोळ्यागत लाटांवरही तरते आहे बरेच काही
आठवणींची लक्ष पाखरे सोडुन येतो दूर वनी मी
मोरपंख उरलेले बघुनी स्मरते आहे बरेच काही
मनोरथांना लगाम लावुन थोपवतो मी विचारचक्रे
तरि न शमे आवेग, मस्तकी फिरते आहे बरेच काही
फक्त दोन थेंबांसाठी मी नदीस करतो कैक याचना
फुटे न पाझर, डोळ्यांतुन पण झरते आहे बरेच काही
हिशेब करतो, उणीच भरते सुखस्वप्नांचीगोळाबेरिज
मात्र व्यथा अन वेदनांसवे उरते आहे बरेच काही
- अनामिक
पाचोळ्यागत लाटांवरही तरते आहे बरेच काही
आठवणींची लक्ष पाखरे सोडुन येतो दूर वनी मी
मोरपंख उरलेले बघुनी स्मरते आहे बरेच काही
मनोरथांना लगाम लावुन थोपवतो मी विचारचक्रे
तरि न शमे आवेग, मस्तकी फिरते आहे बरेच काही
फक्त दोन थेंबांसाठी मी नदीस करतो कैक याचना
फुटे न पाझर, डोळ्यांतुन पण झरते आहे बरेच काही
हिशेब करतो, उणीच भरते सुखस्वप्नांची
मात्र व्यथा अन वेदनांसवे उरते आहे बरेच काही
- अनामिक
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें