नितळ, निरामय, निखळ, निरागस
दिलखुलास, निर्भेळ, निखालस
धुंद, मुक्त, निर्मळ अन् गोंडस
लहानग्यागत तुझे हासणे
दिलखुलास, निर्भेळ, निखालस
धुंद, मुक्त, निर्मळ अन् गोंडस
लहानग्यागत तुझे हासणे
गडगडणाऱ्या नभासारखे
कोसळत्या धबधब्यासारखे
झुळझुळत्या निर्झरासारखे
उसळत्या कारंज्यासारखे
सळसळत्या वादळासारखे
खळखळत्या सागरासारखे
स्वच्छंदी पाखरासारखे
कोसळत्या धबधब्यासारखे
झुळझुळत्या निर्झरासारखे
उसळत्या कारंज्यासारखे
सळसळत्या वादळासारखे
खळखळत्या सागरासारखे
स्वच्छंदी पाखरासारखे
रुणझुणत्या पैंजणांसारखे
गुणगुणत्या कोकिळेसारखे
चिमणीच्या चिवचिवीसारखे
कर्णमधुर भैरवीसारखे
लाटांच्या संगितासारखे
रिमझिमणाऱ्या सरींसारखे
कृष्णाच्या बासरीसारखे
गुणगुणत्या कोकिळेसारखे
चिमणीच्या चिवचिवीसारखे
कर्णमधुर भैरवीसारखे
लाटांच्या संगितासारखे
रिमझिमणाऱ्या सरींसारखे
कृष्णाच्या बासरीसारखे
किती मधुर अन् किती रसाळ
काजूकतली, खिरीसारखे
बासुंदी अन् पुरीसारखे
मोतीचूर लाडवासारखे
आंब्याच्या गोडव्यासारखे
रसरसल्या पोळ्यातुन टपटप
ओघळणाऱ्या मधासारखे
जखमेवर औषधासारखे
काजूकतली, खिरीसारखे
बासुंदी अन् पुरीसारखे
मोतीचूर लाडवासारखे
आंब्याच्या गोडव्यासारखे
रसरसल्या पोळ्यातुन टपटप
ओघळणाऱ्या मधासारखे
जखमेवर औषधासारखे
कोमेजलेल्या कळीला पुन्हा
फुलण्याच्या प्रेरणेसारखे
मरगळलेल्या आयुष्याला
जणू नव्या चेतनेसारखे
फुलण्याच्या प्रेरणेसारखे
मरगळलेल्या आयुष्याला
जणू नव्या चेतनेसारखे
असेच नेहमी चमकत राहो
बरसत राहो तुझे हासणे
पुनवेच्या चांदण्यासारखे
हिरव्यागार श्रावणासारखे
बरसत राहो तुझे हासणे
पुनवेच्या चांदण्यासारखे
हिरव्यागार श्रावणासारखे
- अनामिक
(२१/०२/२०१९, ३०/०३/२०१९)
(२१/०२/२०१९, ३०/०३/२०१९)