11 नवंबर 2012

चांदवा नाही अता (गझल)

वाहती नुसतेच वारे, गारवा नाही अता
दरवळे श्वासात सा-या, ती हवा नाही अता

तीच दुनिया, तीच गजबज, अंगणी तरि शांतता
धुंद किलबिल पाखरांचा तो थवा नाही अता

रात्र नेई दूर, सोबत कैक लुकलुकते दिवे
कुट्ट वाटा उजळणारा काजवा नाही अता

तारका लाखो जरी, अंबर सुने अन कोरडे
चिंब भिजवाया दुधाने चांदवा नाही अता

झोत शब्दांचा पडे कानी, न भिडती भावना
अर्थ मौनाचा कळे, त्या जाणिवा नाही अता

जखडुनी नाती जुनी उरल्यात तुटक्या साखळ्या
जो मने सांधायचा, हळवा दुवा नाही अता

- अनामिक
(०६/११/२०१२ - १०/११/२०१२)

04 नवंबर 2012

बरेच काही (गझल)

अशांत सागर मनी खोलवर मुरते आहे बरेच काही
पाचोळ्यागत लाटांवरही तरते आहे बरेच काही

आठवणींची लक्ष पाखरे सोडुन येतो दूर वनी मी
मोरपंख उरलेले बघुनी स्मरते आहे बरेच काही

मनोरथांना लगाम लावुन थोपवतो मी विचारचक्रे
तरि न शमे आवेग, मस्तकी फिरते आहे बरेच काही

फक्त दोन थेंबांसाठी मी नदीस करतो कैक याचना
फुटे न पाझर, डोळ्यांतुन पण झरते आहे बरेच काही

हिशेब करतो, उणीच भरते सुखस्वप्नांची गोळाबेरिज
मात्र व्यथा अन वेदनांसवे उरते आहे बरेच काही

- अनामिक

18 अक्तूबर 2012

इक शाम काफी है

दिन सवरने के लिये इक शाम काफी है
दिल बहकने चाय के भी जाम काफी है

यूँ घनेरी भीड है, चेहरे हजारो है
जी मचलने के लिये इक नाम काफी है

ना लगे अल्फाज, ना कागज-कलम-स्याही
जो निगाहों ने लिखे पैगाम काफी है

क्यूँ भला हथियार से जीते जमीं दिल की
जो किया तीर-ए-नजर ने काम काफी है

शर्मिली मुस्कान से घायल करो ना यूँ 
इस हँसी पर कत्ल के इल्जाम काफी है

गर चिराग-ए-जिन मिले भी, ना दुआ माँगू
इस सुहानी साथ का ईनाम काफी है

सिलसिले खिलने लगे इन खंडरों में भी
यूँ चले बस, हो न हो अंजाम, काफी है

- अनामिक
(१४/१०/२०१२ - १७/१०/२०१२)