20 नवंबर 2009

कुठेतरी हरवलोय मी...

कुठेतरी हरवलोय मी...
ऑफिसच्या इमारतीत... कामाच्या व्यापात... कंप्यूटरच्या स्क्रीन मध्ये....
२५ किलोमीटर बाईकच्या प्रवासात... कुठे वाहनांच्या गर्दीत... कुठे सुनसान रस्त्यावर.....
हॉल मधल्या भयाण शांततेत... 'कूक'च्या कंटाळ्वाण्या जेवणात... काळोख्या बेडरूम मध्ये... रात्रीच्या चित्र-विचित्र स्वप्नांमध्ये...
सकाळच्या कर्कश्य अलार्म मध्ये.... घाई-घाईत उराकाव्या लागणा-या तयारीत....
वीक-एंड च्या आळशी मूडमध्ये... निरर्थक नेट सर्फिंग मध्ये... मॉलच्या गजबजाटात....
एकंदरीतच एका अतिशय रटाळ जीवनाच्या चक्रव्यूहामध्ये..... Quarter Life Crisis मध्ये.....
स्वतःला कुठेतरी हरवून बसलोय मी.......

4 टिप्‍पणियां:

  1. काय राव, वळिकलं का आमास्नी? नाव आटवतंय का? कंच्याबी ब्लागच्या पयल्या ल्येकावर पर्तिक्रिया द्येनं ही आमची ष्टाईल... :-)

    उत्तर देंहटाएं
  2. वळिकलं तर !! तुमास्नी विसरून कसा चालेल ?
    आनी ही ष्टाईल बेष्ट बगा.. नायतर पयले लेख तर कोन ढुंकून बी नाय बगत !!

    उत्तर देंहटाएं